बाकी बरंच काही !

जगातील पहिला टूथब्रश कोणी आणि कसा बनवला? 500 वर्षांहून अधिक जुना इतिहास

रोज सकाळी आपण झोपेतून उठलो की सगळ्यात आधी कोणती वस्तू हातात घेत असू तर ती आहे ब्रश. याशिवाय आपण आपली सकाळी सुरु झाल्याची कल्पनाच करू शकत नाही.

एकेकाळी आपल्याकडील जुनी लोक दातून किंवा बाभूळाची काठी दात घासण्यासाठी वापरायचे. पण, टूथब्रशने सर्वांचे आयुष्य बदलले. आपल्यापैकी कित्येकांना हे माहित नसेल की, दात घासण्याच्या टूथब्रशचा इतिहास हा 500 वर्षांहून अधिक जुना आहे.

चीन हाच तो देश आहे, ज्याने जगाला टूथब्रशची ओळख करून दिली.

पहिला टूथब्रश डुकराच्या केसांनी बनवलेला होता

सुरुवातीला टूथब्रश डुकराच्या केसांनी बनवलेले होते, जे काही हाड किंवा बांबूच्या तुकड्यांशी जोडलेले होते. सेल्युलोइड लॉयड प्लास्टिक ब्रश हँडल्स पहिल्या महायुद्धानंतरच दिसू लागले. याआधी भारतासह जगभरात दातूनचा वापर सामान्यत: केला जात असे.

1938 मध्ये, प्राण्यांच्या केसांऐवजी नायलॉन ब्रिस्टल्स वापरल्या गेल्या. एका सर्वेक्षणात लोक म्हणाले की, ते दात घासण्याशिवाय आपल्या आयुष्याची कल्पना करू शकत नाहीत. 1939 मध्ये स्विस इलेक्ट्रिक टूथब्रश आला, परंतु 1961 मध्ये स्किबच्या ब्रोक्सोडेन्टला यात मोठे यश मिळाले.

हळूहळू पलटलं टूथब्रशचं रूपडं

चीनमध्ये टूथब्रशच्या अविष्कारानंतर इंग्लंडमध्ये 1780 मध्ये विल्यम एडिस नावाच्या व्यक्तीने थोडासा आधुनिक टूथब्रश बनवला. पण पेटंटच्या बाबतीत अमेरिकेचा विजय झाला. 7 नोव्हेंबर, 1857 रोजी अमेरिकेच्या एच.एन.वासवर्थ यांना टूथब्रशसाठी पेटंट प्राप्त झाले, ज्याचा पेटंट क्रमांक 18653 होता.

आज आपण वापरत असलेल्या टूथब्रशचे 1938 मध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झाले. दंतवैद्य म्हणतात की, आज टूथब्रश मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे, परंतु बहुतेक लोकांना त्याचा योग्य प्रकारे वापर कसा करावा हे अद्याप माहित नाही.

500 वर्षांपूर्वी लागला शोध

500 वर्षांपूर्वी म्हणजेच 26 जून 1498 रोजी, चीनच्या राजाने ब्रशची रचना केली. ज्यामुळे दात दातुनपेक्षा अधिक व्यवस्थित स्वच्छ करता येतील. म्हणुनच, जगभरात 26 जून हा दिवस ‘टूथब्रश डे’ म्हणून साजरा केला जातो. सुरुवातीच्या टूथब्रशचे हँडल हाड किंवा बांबूच्या लाकडापासून बनवलेले होते.

त्यात डुक्कराच्या केसांचा वापर दात घासण्यासाठी केला जात असे. हळूहळू टूथब्रशचा इतिहास बदलला आणि शोधकर्त्यांनी त्यांच्या स्वत:च्या मार्गाने त्या आकार आणि रूप बदलण्याचा प्रयत्न केला.

Team Nation Mic

Recent Posts

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…

10 months ago

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…

1 year ago

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…

1 year ago

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…

1 year ago

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…

1 year ago

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…

1 year ago

This website uses cookies.