Take a fresh look at your lifestyle.

जेव्हा अटलजींनी हुंड्यामध्ये पाकिस्तानची मागणी केली

0

अटलबिहारी वाजपेयी देशातील सर्वोच्च राजकीय नेत्यांपैकी एक होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ज्या काही मोजक्या नेत्यांनी भारतीय राजकारणावर आपला कायमस्वरूपी ठसा उमठवला त्यामध्ये अटलजींचे नाव वरच्या क्रमांकावर असेल.

अटलजी पंतप्रधान असताना त्यांनी भारत पाकिस्तान मधील सबंध सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्याच वेळी त्यांनी अमृतसर ते लाहोर अशी दोन्ही देशांमधील बससेवा सुरू केली. एवढंच नाही तर स्वतः अटलजीनी अमृतसर ते लाहोर असा बसमधून प्रवास केला.

लाहोर मध्ये अटलजींचे मोठे जोरदार स्वागत झाले. दोन्ही देशातील सबंध सुधारण्यासाठी अटलजींनी केलेल्या प्रयत्नाचे मोठे कौतुक झाले. लाहोर मध्ये पोहचल्यावर गव्हर्नर हाउस मध्ये कार्यक्रमात अटलजींनी जबरदस्त भाषण केले.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या या भाषणानंतर एका पाकिस्तानी महिला पत्रकाराने अटलजींनी एक प्रश्न विचारला. या महिला पत्रकाराने पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना विचारले की “तुम्ही अद्याप लग्न का केले नाही?”

एवढचं नाही तर ती पुढे म्हणाली “मला तुमच्याशी लग्न करायचं आहे पण माझी एक अट आहे की तू मला मुंह दिखाईवर काश्मीर देवू शकता ?”

महिला पत्रकाराच्या या अजब प्रश्नांने अटलजी आपल्या नेहमीच्या अंदाजात हसले आणि म्हणाले. “मी लग्नासाठी तयार आहे पण मला हुंड्यामध्ये पूर्ण पाकिस्तान हवा आहे.”

जेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांनी मनमोहन सिंग यांना राजीनामा देण्यापासून रोखले

१९९१ साली देशात कॉंग्रेसचे सरकार आल्यानंतर पी. व्ही. नरसिंहराव देशाचे पंतप्रधान झाले. देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी नरसिंहराव यांनी मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री केले. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी लखनऊ मधून खासदार तर लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते होते. अर्थमंत्री झाल्यानंतर मनमोहन सिंग आपला अर्थसंकल्प सादर केला.

अर्थमंत्री असलेल्या मनमोहन सिंग यांच्या बजेटवर विरोधी पक्षातील अटलजींनी जोरदार टीका केली.

अटलजीनी केलेल्या जोरदार टीकेमुळे राजकारणात नवीन असलेले मनमोहन सिंग दुखी झाले. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान असलेल्या नरसिंहराव यांच्याकडे जावून मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले.

नरसिंहराव यांनी मनमोहन सिंग यांचे म्हणणे ऐकून अटलजींना फोन लावला. त्यांना संपूर्ण प्रकरण सांगितले. त्यानंतर अटलजीनी मनमोहन सिंग यांची भेट घेतली. मनमोहन यांना अटलजींनी समजावून सांगितले त्यांची टीका हि राजकीय होती. ती वैयक्तिक स्वरुपात नाही घेतली पाहिजे. त्यामुळे मनमोहन सिंग यांनी आपला राजीनामा देण्याचा निर्णय बदलला.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.