मैदानातून

भारताने जिंकलेला बॅडमिंटनचा थॉमस कप आहे तरी काय ?

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन विश्वात मानाची समजली जाणाऱ्या थॉमस कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडाकेबाज खेळ करत भारतीय संघाने आपलं पहिलं-वहिलं विजेतेपद मिळवलं आहे.

अंतिम फेरीत भारताने इंडोनेशियाचा ३-० ने धुव्वा उडवत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. उपांत्य फेरीत भारताने डेन्मार्कवर अटीतटीच्या लढतीत ३-२ ने मात करत आपलं पदक निश्चीत केलं होतं.

भारताला पहिल्यांदाच सुवर्णयश

बॅडमिंटनचा विश्वचषक असं थॉमस चषक स्पर्धेचं वर्णन केलं जातं. आतापर्यंत केवळ सहा देशांनीच या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे.

थॉमस चषक स्पर्धेच्या 73 वर्षांच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच सुवर्णयश साकारलं आहे. पुरुषांच्या सांघिक स्पर्धा थॉमस चषक तर महिलांची उबर चषक या नावाने खेळवण्यात येते. तीन एकेरी आणि दोन दुहेरी असं या सामन्यांचं स्वरुप असतं.

अंतिम लढतीत लक्ष्य सेनने अँथनी गिनटिंगवर थरारक विजय मिळवला. दुसऱ्या लढतीत सात्विकसैराज-चिराग शेट्टी जोडीने एहसान-सुकाम्युलिजो जोडीवर 18-21, 23-21, 21-19 असा विजय मिळवला. तिसऱ्या लढतीत किदंबी श्रीकांतने जोनाथन ख्रिस्तीवर 21-15, 23-21 असा विजय मिळवत भारताच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केलं.

भारतीय संघाने अंतिम फेरीत एकही सामना गमावला नाही

इंडोनेशियाचा संघ या स्पर्धेतला तुल्यबळ संघ म्हणून ओळखळा जातो. आतापर्यंत इंडोनेशियाने १४ वेळा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. चीनच्या नावावर या स्पर्धेची 10 तर मलेशियाने 5 वेळा जेतेपद पटकावलं आहे. डेन्मार्क आणि जपान यांच्याप्रमाणे भारतानेही आता या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. परंतू भारतीय संघाने अंतिम फेरीत एकही सामना न गमावता, कडवी झुंज मोडून काढत पहिल्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे.

सुरुवातीला तीन वर्षांनी खेळाली जाणारी हि स्पर्धा आता दोन वर्षांनी खेळली जाते

सुरुवातीला दर तीन वर्षांनी थॉमस चषक स्पर्धा खेळवण्यात असे. काही वर्षांनंतर या स्पर्धेच्या संरचनेत बदल करण्यात आला आणि दर दोन वर्षांनी ही स्पर्धा खेळवण्यात येऊ लागली. बेस्ट ऑफ फाईव्ह असं या लढचींचं स्वरुप असतं.

भारताने याआधी 1952, 1955 आणि 1979 मध्ये थॉमस चषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.

सिंगापूर, इंडोनेशिया, मलेशिया अशा ठिकाणी ही स्पर्धा पार पडत होती. पहिली तीन वर्षे मलेशियाने स्पर्धा जिंकल्यानंतर मग इंडोनेशियाने काही वर्ष अधिराज्य गाजवलं. 1982 मध्ये स्पर्धा लंडनमध्ये झाली आणि चीनने विजय मिळवत इंडोनेशिया आणि मलेशिया या दोघांशिवाय तिसऱ्या संघाने विजय मिळवल्याची घटना घडली. त्यानंतर चीन, मलेशिया, इंडोनेशिया हेच संघ विजय मिळवताना दिसत आहे.

दरम्यान स्पर्धेची सुरुवात झालेल्या पहिल्याच वर्षी आशियाई देश मलेशियाने डेन्मार्कला अंतिम सामन्यात 8-1 ने मात देत कप नावे केला होता. पहिल्याच वर्षी आशियाई संघाने विजय मिळवला, ज्यानंतर पुढील अनेक वर्षे ही स्पर्धा आशियात होऊ लागली.

केवळ 2014 साली जपानने तर 2016 साली डेन्मार्कने हा सामना जिंकला होता. विशेष म्हणजे डेन्मार्क हा ही स्पर्धा जिंकणारा एकमेव असा देश आहे जो आशिया खंडातील नाही आहे. इंग्लंडच्या भूमीत जन्माला आलेल्या या खेळामध्ये बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन या अधिकृत बॅडमिंटन फेडरेशनमध्ये असणारे सर्वच देश सहभाग घेत असतात.

यंदा 2022 साली भारताने या स्पर्धेत चॅम्पियन इंडोनेशियाला मात देत पहिलं वहिला चषक मिळवला आहे.

त्यामुळे ही स्पर्धा जिंकणार भारत जगातील सहावा देश बनला आहे. यंदा भारतीय बॅडमिंटन संघाने सुरुवातीपासून अप्रतिम कामगिरी सुरु ठेवली. त्यांनी आधी डेन्मार्कला सेमीफायनलमध्ये मात दिल्यानंतर अंतिम सामन्यात इंडोनेशियाला सुरुवातीच्या तीन सामन्यात मात दिली.

Team Nation Mic

Recent Posts

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…

10 months ago

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…

1 year ago

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…

1 year ago

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…

1 year ago

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…

1 year ago

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…

1 year ago

This website uses cookies.