राष्ट्रवादीचा प्रवास तिथून सुरू होतो !
आज १० जून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा वर्धापनदिन !
आजच्या च दिवशी आदरणीय पवार साहेबांनी इंदिरा काँग्रेस मधून बाहेर पडून स्वतंत्र अशा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची १९९९ साली स्थापना केली होती.त्यावेळी लावलेल्या रोपट्यांचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.सामान्य कार्यकर्त्यांना आपलासा वाटणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. गल्ली ते दिल्ली मग हार असो की जीत असो कायम राष्ट्रवादी काँग्रेस ची च चर्चा होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे आजघडीला देशाचे सर्वाच्च नेते आहेत.आदरणीय कार्यकर्त्यांना साहेबांचे नेहमीच प्रेमाचे आणि अनमोल मार्गदर्शन असते. आजही ८० वर्षाचे साहेब न थकता न हरता काम करत राहतात ही सर्वसामान्यांना एक ऊर्जा,स्फूर्ती आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्या ज्या वेळी सत्तेत होती त्या त्या वेळी सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय,शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेण्यावर साहेबांनी भर दिला आहे.
अगदी सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याला साहेबांनी उच्च पदावर पोहोचवले आहे याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे स्व.आर.आर.आबा.आर.आर. आबांना साहेबांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेबांनी कृषीविषयक अनेक महत्वपूर्ण योजना,कृषीविषयक धोरण राबवले व ते प्रत्येक शेतकऱ्यांबद्दल पोहोचेल याची काळजी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत असताना त्यांनी शेतीविषयक, कर्मचाऱ्यांसाठी, तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण उपक्रम, योजना राबविल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमीच विकासासोबत आहे, राष्ट्रवादी च्या ताब्यातील पिंपरी चिंचवड, पुणे, बारामती, नवी मुंबई ही शहरे जगाच्या नकाशावर झळकली ती केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुळे.
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून पिंपरी चिंचवड चा उल्लेख होतो याचे सर्व श्रेय जाते ते अजितदादांना.
नवी मुंबई जगातील स्वच्छ व पर्यावरण च्या बाबतीत अग्रेसर आहे ते केवळ आदरणीय पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे. विकासकामांच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमी आग्रही भूमिका घेतलेली दिसून येते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये अभ्यासू व हुशार लोकांचा भरणा आहे.जयंत पाटील साहेबांचे इस्लामपूर हे भारतातील सर्वात पहिले wi fi फ्री शहर ठरलेले आहे.राष्ट्रवादी च्या मागील टर्ममध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असलेल्या राजेश भैय्या टोपे यांची मंत्रिपदाची कारकीर्द विशेष अभ्यासू म्हणून गाजली.त्यांच्या कारकिर्दीचा विरोधक आजही विशेष उल्लेख करतात.सध्या त्यांच्या आरोग्यखात्याचा देशात गौरव होतोय.आर.आर.आबांनी चालू केलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे महत्व आज आपणास समजत आहे.माजी विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे साहेबांनी मागील ५ वर्षातील गाजवलेले विरोधी पक्षनेते पद आपण सर्वांनी पाहिलेले आहे.
मागील सत्तेच्या कार्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बहुजनपयोगी अनेक निर्णय घेतले जसे की पुणे विद्यापीठाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देणे,मराठा समाजाला राष्ट्रवादी ने च १६ % आरक्षण दिले होते,मुस्लिम समाजाला ५ % आरक्षण याच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिलेले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे कार्यकर्ते तळागाळात पोहोचलेले आहेत.आदरणीय पवार साहेबांनी कार्यकर्त्यांना दिलेली वागणूक,केलेले मार्गदर्शन हे कायम कार्यकर्त्यांना उत्साहवर्धक च राहिलेले आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत जरी नसला तरी कार्यकर्त्यांचे सर्वाधिक जाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतच असल्याचे विरोधक ही मान्य करतात. आदरणीय साहेबांच्या विचारांनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा कार्यकर्ता घडत असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ८० % समाजकारण व २० % राजकारण या तत्वानुसार काम करते. शेतकरी,दिन-दुबळ्यांच्या कोणत्याही समस्या असल्या की मग भले ही स्वतः च्या सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरते.
आदरणीय साहेबांच्या चमत्कारामुळे यावेळी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत आहे. स्थापनेपासूनच्या ५ पैकी ४ टर्म मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. होय हीच तर आहे साहेबांची जादू.
- डॉ.कपिल झोटिंग, औरंगाबाद
- प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष : सोशल मीडिया सेल
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम