उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या पूर्वी या “ठाकरे”ने निवडणूक लढवली होती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ घेतली. यापूर्वी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि भरघोस मतांनी निवडून देखील आले आहेत.
विधानसभा निवडणूक होण्याच्या बरेच दिवस आधी अनेक चर्चा चालू होत्या की ठाकरे कुटुंबातील व्यक्ती निवडणूक लढणार का ? पण आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक लढल्याने अखेर या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. पण यासोबत आणखी एक चर्चा चालू होती, ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे पहिले असतील. त्याला तसा दुजोराही दिला गेला. पण हे असं नाही. यापूर्वी ठाकरे कुटुंबातील एका व्यक्तीने निवडणूक लढवली होती.
ती व्यक्ती कोण ?
तर ती व्यक्ती आहे शालिनी ठाकरे. आता तुम्ही म्हणाल या शालिनी ठाकरे कोण ? तर शालिनी ठाकरे या मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चुलत (चचेरे) भाऊ जितेंद्र ठाकरे यांच्या पत्नी आहेत. जितेंद्र ठाकरे माजी रणजीपटू आहेत. जितेंद्र ठाकरे यांचे आजोबा दामोदर ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे चुलते होते.
शालिनी ठाकरे सध्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत कार्यरत आहेत. शालिनी ठाकरे यांनी २००९ साली वायव्य मुंबई मतदार संघातून मनसे कडून निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना विजय मिळवता आला नव्हता. त्या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. यावेळी या मतदारसंघातून कॉंग्रेसचे गुरुदास कामात लोकसभेत निवडून गेले होते.
त्यामुळे ठाकरे कुटुंबातील निवडून येणारे ते पहिले ठाकरे आदित्य ठाकरे असतील. पण निवडणूक लढवणारे ते पहिले ठाकरे नाहीत. हे मात्र लक्षात घ्यायला हवं.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम