बाळासाहेबांनी विचारलं “उद्धवची निवड झाली ठिक आहे, पण तुम्हाला मान्य आहे ना ?”
१९६६ साली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेनेचे प्रमुख राहिले. स्थापनेपासून शिवसेनेची काम करण्याची पद्धत देखील इतर पक्षापेक्षा वेगळी राहिली आहे. अगदी पक्ष संघटनेतील पदांची वाटणी देखील इतर पक्षापेक्षा वेगळी असते.
सुरुवातीला शिवसेनाप्रमुख आणि शिवसेना नेते अश्या दोनच पदांमध्ये शिवसेनेची विभागणी होती. पण २००३ साली हे समीकरण बदललं.
कारण त्यावर्षी शिवसेनच्या महाबळेश्वर अधिवेशनात एक नवं पद तयार केले गेले. ते शिवसेना कार्याध्यक्ष.
२००३ साली उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले.
फोटोग्राफर उद्धव
बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत सुरुवातीच्या राजकीय काळात उद्धव फारसे सोबत नसत. अगदी २००३ साली शिवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याआधी उद्धव ठाकरे राजकारणात फारसे दिसले नव्हते.

उद्धव ठाकरे व्यावसायिक फोटोग्राफर होते, हे आता खरतरं संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. अगदी राजकारणात सक्रीय झाल्यानंतर देखील त्यांनी आपली फोटोग्राफीची आवड जपली.
त्यांनी टिपलेल्या फोटोंचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्येही लागल्याचं अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे.

आपली फोटोग्राफीची आवड जपत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अनेक गडकिल्ल्यांचे फोटो काढले आहेत. काही वर्षापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे वैभव मानली जाणारी वारी देखील आपल्या कॅमेरा मधून टिपली. त्यांच्या या वारीतील फोटोंचे पुढे पुस्तक देखील प्रकाशित झालं.
महाबळेश्वर अधिवेशन
शिवसेनाप्रमुख आणि शिवसेना नेते यांच्यामध्ये एक २००३ साली तयार करण्यात आले, ते म्हणजे कार्याध्यक्ष. २००३ साली निर्माण केलेले हे पद उद्धव ठाकरे यांच्यासाठीच तयार करण्यात आले. असं देखील म्हणता येईल. कारण पद निर्मितीनंतर लगेचच त्या पदावर उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली.

महाबळेश्वरच्या अधिवेशनात स्वतः राज ठाकरे यांनीच उद्धव ठाकरे यांच्या निवडीचा ठराव मांडला होता. पण उद्धव ठाकरे यांच्या कार्याध्यक्ष पदी झालेल्या निवडीने बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार उद्धव ठाकरे हेच असतील, हे नक्की झालं.
उद्धव ठाकरे यांची निवड झाल्यानंतर शिवसेनाप्रमुखांचे सभागृहात आगमन झाले. त्यांनी प्रतिनिधीसभेत ‘उद्धवची निवड झाली ठिक आहे, पण तुम्हाला मान्य आहे ना, तुमच्यावर जबरदस्ती तर होत नाही?’ असा प्रश्न त्यांनी विचारला त्यावर उपस्थितांनी ‘नाही, नाही’ असे उतर दिले
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम