Take a fresh look at your lifestyle.

तर बाबू जगजीवनराम देशाचे पहिले दलित पंतप्रधान झाले असते

0

आपल्या देशातील राजकारणात कायमच दलित राजकारण हा महत्वाचा मुद्दा राहिला आहे. स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा दलित नेता कोण असा विचार करताना एकच नाव येते, ते म्हणजे डॉ. आंबेडकर. पण डॉ. आंबडेकर यांच्या सोबतच एक अजून एक नेता होता, ज्याच्या नावावर सलग ५० वर्ष खासदार असण्याचा विक्रम आहे. सोबतच सर्वाधिक काळ मंत्री राहण्याचा देखील विक्रम आहे.

तो नेता म्हणजे बाबू जगजीवनराम

बनारस हिंदू सोडावे लागले

जगजीवनराम यांचा जन्म ५ एप्रिल १९०८ रोजी बिहारमधील भोजपूर येथे झाला. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक मदन मोहन मालवीय यांनी एकदा जगजीवनराम यांची भेट झाली. जगजीवनराम यांची प्रतिभा पाहून मालवीय प्रभावित झाले. त्यांनी शिकण्यासाठी त्यांना आमंत्रित केले.

मालवीय यांच्या आमंत्रनावरून जगजीवनराम बनारस विद्यापीठात शिकण्यासाठी आले. पण विद्यापीठातील भेदभावामुळे जगजीवनराम नाराज झाले. त्यांनी अखेर कोलकात्याला जाण्याचा निर्णय घेतला. पुढे त्यांनी कलकत्ता युनिव्हर्सिटी मधून आपले ग्रज्युएशन पूर्ण केले.

पहिल्या मंत्रिमंडळात मंत्री

जगजीवनराम यांना १९४६ साली स्थापन झालेल्या पंडित नेहरू यांच्या अंतरिम मंत्रिमंडळात कामगार मंत्री म्हणून संधी दिली गेली होती. त्या मंत्रिमंडळातील ते सर्वात कमी वयाचे मंत्री होते.

इंदिरा कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष

काँग्रेसमधल्या अंतर्गत वादातून इंदिरा गांधी यांनी जेव्हा इंदिरा कॉंग्रेसची स्थापना केली. तेव्हा जगजीवनराम यांनाच आपल्या पक्षाचे अध्यक्ष केले होते. कारण इंदिरा गांधी यांना सुद्धा जगजीवन राम यांच्या प्रभावाची जाणीव होती.

इंदिरा विरोधात

१९७५ साली जेव्हा न्यायालयाने जेव्हा इंदिरा गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले. तेव्हा देखील ते इंदिरा गांधी यांच्या सोबत होते. परंतु जेव्हा इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावण्याचा निर्णय घेतला. तेव्हा जगजीवनराम इंदिरा गांधी यांच्या विरोधात गेले.

पंतप्रधानपद

देशात आणीबाणी लागू केल्यानंतर जगजीवनराम यांनी कॉंग्रेस पक्ष सोडला आणि कॉंग्रेस फॉर डेमोक्रसी या नव्या पक्षाची स्थापना केली. परंतु जनता पक्षाच्या निर्मितीनंतर त्यांनी त्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. जगजीवनराम जनता पक्षासोबत गेल्यानंतर दलित मते जनता पक्षाला मिळतील. निवडणुकीचा जेव्हा निकाल जाहीर झाला. तेव्हा इंदिरा गांधी यांचा पराभव झाला होता. जनता पक्षाला बहुमत प्राप्त झाले होते.

जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर अनेकांना जगजीवनराम पंतप्रधान बनतील अशी अपेक्षा होती. त्यावेळी पंतप्रधान पदासाठी तीन दावेदार होते. जगजीवनराम, मोरारजी देसाई आणि चरण सिंह. परंतु जयप्रकाश नारायण यांच्या मध्यस्थीमुळे मोरारजी देसाई पंतप्रधान बनले.

त्यामुळे जगजीवनराम नाराज झाले. त्यांनी सत्तेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. पण पुन्हा एकदा जयप्रकाश नारायण यांच्या आग्रहाखातर ते सत्तेत सहभागी झाले आणि त्यांना उपपंतप्रधान करण्यात आले.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.