एकदाही मंत्रिपद न स्वीकारता थेट पंतप्रधान बनणारा नेता !
१० नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१ हा एवढाच काळ चंद्रशेखर देशाचे पंतप्रधान राहिले, पण चंद्रशेखर हे एकमेव पंतप्रधान होते. ज्यांना पंतप्रधान बनण्यापूर्वी कोणत्याही मंत्री पदाचा अनुभव नव्हता.
मंत्रीपद स्वीकारण्याच्या अनेक संधी नाकारत ते थेट पंतप्रधान बनले.
चंद्रशेखर सिंह प्रखर वक्ता, राजकीय नेता यासोबतच एक लेखक आणि समीक्षक होते. त्याच्या स्पष्ट वक्ता स्वभावामुळे अनेकजण त्याच्यापासून दूर राहत. कॉलेजात असतानाचा त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला होता. १५५१ साली ते सोशलिस्ट पार्टीचे पूर्णवेळ कार्यकर्ता बनले पण सोशलिस्ट पार्टीमध्ये फुट पडल्यावर ते कॉंग्रेस मध्ये सहभागी झाले.
मंत्री बनण्यास नकार
चंद्रशेखर राजकीय जीवनात १९५१ साली आले, पण त्याच्या संसदीय कारकिर्दीला सुरुवात १९६२ साली झाली. १९६२ साली उत्तर प्रदेश मधून ते राज्यसभेवर निवडून गेले होते.
१९६२ पासून अंतिम श्वासापर्यंत (१९८४ ते १९८९ चा अपवाद वगळता) ते कायम लोकसभेवर निवडून जात राहिले. पण एकाही वेळेस चंद्रशेखर मंत्री बनले नाहीत.
१९७५ साली देशात जेव्हा आणीबाणी लागू झाली तेव्हा चंद्रशेखर कॉंग्रेस मध्ये असूनही त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. आणीबाणी नंतर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येवून जनता पार्टी स्थापन केली. चंद्रशेखर जनता पक्षाचे अध्यक्ष बनले. देशात जनता पक्षाची सत्ता आली, पण त्याही वेळी चंद्रशेखर यांनी मंत्रीपद स्वीकारले नाही.
सात महिने पंतप्रधान
१९९० साली चंद्रशेखर यांना पंतप्रधान बनण्याची संधी मिळाली, पण फक्त सात महिन्यासाठी. पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह सरकारचा पाठींबा भाजपने काढल्यावर सरकार अल्पमतात आले. तेव्हा चंद्रशेखर यांच्यासोबत ६४ खासदार जनता पक्षातून बाहेर आले.
तेव्हा चंद्रशेखर यांनी राजीव गांधी यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तेव्हा चंद्रशेखर देशाचे पंतप्रधान बनले. सात महिने ते देशाचे पंतप्रधान राहिले. त्याच काळात त्यांनी गृह आणि संरक्षण खात्याचा कारभार पहिला होता.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम