राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि प्रसाद लाड आमदार झाले
राणे यांच्या अटकेनंतर राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्याबरोबर बडे नेतेही आक्रमक झालेले दिसले. या सर्वाधिक आक्रमक झाले ते म्हणजे भाजपा नेते प्रसाद लाड.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. त्याचे पडसाड राजकीय पटलावर उमटू लागले आहेत. राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला असून शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे.
नारायण राणे यांच्या अटकेनंतर राज्य भाजप मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे दिसले. राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्याबरोबर बडे नेतेही आक्रमक झालेले दिसले. या सर्वाधिक आक्रमक झाले ते म्हणजे भाजपा नेते प्रसाद लाड.
राणे साहेबांचा नेमका गुन्हा काय?
राणे साहेबांच्या जीवाला धोका आहे.
गुन्ह्यासंबंधित अरेस्ट वॉरंट दाखवा अन्यथा मला अटक करा! pic.twitter.com/xRav3AGaGi— Prasad Lad (@PrasadLadInd) August 24, 2021
प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका तर केलीच सोबत राणे यांना अटक होताच त्यांनी थेट पोलीस चौकीत ठिय्या मांडलेला पाहायला मिळाला. यावेळी बोलताना त्यांनी कोणतीही कलमं नसताना राणेंना अटक केल्याचा आरोपही केला.
नारायण राणे यांनी राजीनामा दिला आणि प्रसाद लाड आमदार झाले
२०१४ साली विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राणे यांचे राजकीय पुनर्वसन करताना त्यांना विधानपरिषद देण्यात आली होती. पण २०१७ साली कॉंग्रेसवर नाराज होवून नारायण राणे यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
कॉंग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर राणे यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला. यावेळी राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे विधानपरिषदेची एक जागा रिक्त झाली होती.
या पोटनिवडणुकीत भाजपने पक्षातील एकनिष्ठ नेत्यांना डावलून प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली होती.
प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याची चांगलीच चर्चाही रंगली होती. लाड यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीने दिलीप माने यांना मैदानात उतरवले होते आणि मत फुटल्याने प्रसाद लाड विजयी झाले होते .
कोण आहेत प्रसाद लाड ?
प्रसाद लाड हे मूळचे उद्योगपती आहेत. ते मुंबईत क्रिस्टल सुरक्षा एजन्सी चालवतात. सध्या भाजपात असलेले प्रसाद लाड याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. मुंबई बँकेचे ते संचालक आहेत.
मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत लाड यांचा शिवसेनेमुळेच निसटता पराभव झाला होता.
म्हणून मग त्यांनी यावेळी सर्वात आधी मातोश्रीचा पाठिंबा मिळवला मगच निवडणुकीत उडी घेतली. भाजपनेही राणेंचा पत्ता कट करून लाड यांनाच उमेदवारी दिली. आघाडीच्या काळात त्यांनी म्हाडाचं अध्यक्षपदही सांभाळलं असून
करोडपती आमदार
प्रसाद लाड यांची एकूण संपत्ती २१० कोटी ६२ लाख असल्याची माहिती त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून पुढे आली होती .
विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अर्ज प्रसाद लाड यांनी अर्ज दाखल केला. त्यावेळी प्रसाद लाड यांची एकूण संपत्ती २१० कोटी ६२ लाख असल्याची माहिती त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून पुढे आली होती .
वादग्रस्त वक्तव्य
आम्ही भाजपच्या कार्यक्रमला आलोय. यांना वाटतंय की शिवसेना भवन तोडायला आले की काय? जर अंगावर आले तर शिवसेना भवन ही तोडू असा थेट इशारा भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेनेला दिला होता.
प्रसाद लाड यांच्या विधानामुळे वाद निर्माण देखील निर्माण झाला होता. आपल्या विधानामुळे वाद निर्माण झाला हे लक्षात आल्यानंतर प्रसाद लाड यांनी लगेच यू टर्न घेतला होता. प्रसाद लाड यांनी ट्वीट करून आपल्या विधानाबद्दल सारवासारव केली होती.
नारायण राणे यांच्या अटकेनंतर आज प्रसाद लाड सर्वाधिक आक्रमक झालेले दिसले. पण काही वर्षापूर्वी राणे यांच्या राजीनाम्यामुळे लाड यांना आमदारकीची संधी मिळाली होती. त्याचा असाही एक किस्सा.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम