Take a fresh look at your lifestyle.

शाखाप्रमुख होण्यासाठी उद्धव ठाकरे यांना भेटलेले नार्वेकर त्यांचे पीए कसे बनले ?

0

‘सप्टेंबर १९९४ चा नेहमीसारखाच एक दिवस… एक तरुण उद्धवसाहेब ठाकरे यांना भेटला. म्हणाला मला शाखप्रमुख बनायचं आहे. साहेब म्हणाले, “शाखाप्रमुख बनायचं आहे की पक्ष देईल ती जबाबदारी घ्यायची आहे?” उद्धवसाहेबांचा शब्द प्रमाण मानून ते देतील ती जबाबदारी घेण्यासाठी तो तरुण तयार झाला. त्याच नाव म्हणजे मिलिंद नार्वेकर.

मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याचे बांधकाम सीआरझेड-3 मध्ये येत असूनही त्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली नाही, असा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. यासंदर्भात त्यांनी तक्रारी सुद्धा केल्या होत्या.

शिवसेनेची सत्ता असल्याने स्थानिक प्रशासन कारवाई करत नसल्याचाही आरोप भाजपकडून करण्यात आला होता. मिलिंद नार्वेकर यांच्या या बंगल्याचं पाडकाम सुरू असल्याचा व्हीडिओ भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्वीट केला होता.

पहिल्यांदा भेट

मिलिंद नार्वेकर हे एक शिवसैनिक होते. मुंबईतील मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरात नार्वेकर शिवसनेच्या गटप्रमुख पदाचं काम पाहायचे. 1992च्या महापालिका निवडणुकांआधी त्याच्या परिसरातील वॉर्ड विभागला गेला.

नव्या वॉर्डचं शाखाप्रमुखपद मिळेल या आशेने नार्वेकरांनी मातोश्री गाठली. एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेले मिलिंद नार्वेकर हे शाखाप्रमुख होण्यासाठी मुलाखत देण्याकरिता उद्धव यांना पहिल्यांदा भेटले.

उद्धव ठाकरे यांचे पीए बनले

हुशार, स्मार्ट, बोलण्यात पटाईत असा नार्वेकरांमधील चमक पाहून उद्धव ठाकरेंनी त्यांना फक्त शाखाप्रमुख बनायचंय की आणखी काही जबाबदारी उचलायची तयारी आहे.

मिलिंद नार्वेकरांना पटकन उत्तर दिलं तुम्ही सांगाल ते.

तेव्हापासून मिलिंद नार्वेकर हे सावलीसारखे उद्धव यांच्यासोबत आहेत. साधारण 1994 सालच्या उत्तरार्धात मिलिंद नार्वेकर रितसर उद्धव ठाकरे यांचे पीए बनले.

फोटोग्राफीची कला अवगत केली

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची जबलपूर, बांधवगडच्या अभयारण्यात वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सहवासात फोटोग्राफीची कला अवगत केली. मिलिंद नार्वेकर यांनी अभयारण्यातील वाघांचे खास फोटो देखील टिपलेले आहेत.

आधी मातोश्रीवर पडेल ते काम करायचे आणि त्यानंतर मिलिंद नार्वेकर रितसरपणे उद्धव ठाकरेंचा पीए बनले. अपॉइण्टमेण्ट घेणं, डायरी ठेवणं, फोन घेणं, दौरे आखणं, व्यवस्था करणं अशी उद्धव ठाकरेंची अनेत कामं ते पाहू लागले. उद्धव ठाकरेंकडे शिवसेनेची सत्ता आल्यानंतर मिलिंद नार्वेकरही उद्धव ठाकरेंसोबत मोठे होतं गेले.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.