सरकार कोणाचेही असो “रामविलास पासवान” त्यामध्ये मंत्री असतातच !

भारत हा असा देश आहे, जिथे सतत कोणत्या तरी निवडणुका असतात. त्यामुळे भारतीय जनतेला चर्चेला कायम विषय उपलब्ध असतात. पुढच्या काही दिवसात बिहार विधानसभा निवडणुक आहे. त्याची चर्चा चालू आहे. या चर्चेत एक नाव आहे, ते कोणत्या बाजूला जाणार यावरून मोठ्या चर्चा सुरु आहेत.

ते नाव म्हणजे रामविलास पासवान. कारण सध्या भाजपसोबत असलेले पासवान भाजपवर नाराज आहेत पण ते ज्या पक्षासोबत जातात, त्या पक्षाची सत्ता येते अस मानल जात.

रामविलास पासवान सध्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. मागील जवळपास ५० वर्षे ते राजकारणात सक्रीय असले तरी सर्वाधिक काळ मंत्री म्हणून काम करण्याचा त्यांचा रेकोर्ड आहे.

पासवान यांना राजकारणातील “मौसम वैज्ञानिक” मानल जात. याला कारण म्हणजे सत्ता कोणाची येणार, याची चाहूल पासवान यांना लवकर लागते आणि ते त्या पक्षासोबत सत्तेत सहभागी होतात.

पासवान यांना “मौसम वैज्ञानिक” का म्हटलं जात ?

  • १९७७ साली जनता पक्षाच्या तिकिटावर रामविलास पासवान हाजीपुर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते.
  • १९८९ मध्ये वी. पी. सिंह यांच्या मंत्रीमंडळात रामविलास पासवान यांना कामगार मंत्री म्हणून संधी मिळाली होती. त्यानंतर ६ पंतप्रधानांच्या मंत्रीमंडळात पासवान मंत्री राहिले आहेत.
  • १९९६ साली देवगौडा सरकारमध्ये पासवान मंत्री झाले होते. १९९६ ते ९८ पर्यंत पासवान मंत्री राहिले.
  • १९९८ साली जेव्हा अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान बनले. तेव्हा पासवान एनडीए मध्ये सामील झाले आणि अटल सरकारमध्ये मंत्री बनले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या
  • दुसऱ्या सरकारमध्येपण पासवान मंत्री राहिले.
  • २००४ साली देशात कॉंग्रेसचे सरकार आले. मनमोहन सिंह पंतप्रधान झाले. त्या सरकारमध्ये पण पासवान पुन्हा मंत्री झाले. २००९ साली दुसऱ्या सरकारमध्ये पण ते मंत्री झाले.
  • मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळात कॉंग्रेससोबत पासवान यांचे जुळलेले सुत तुटले आणि त्याच वेळी देशात मोदी लाट येत असल्याची हवा पासवान यांनी ओळखली.
  • २०१४ साली नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बनले. पासवान मोदी यांच्या सरकारमध्ये पुन्हा मंत्री बनले. २०१९ ला मोदी २.० मध्ये देखील पासवान यांना पुन्हा मंत्रीपद मिळाले आहे. ते आजपर्यंत तरी आहे.

देशाच्या राजकारणाची योग्य दिशा ओळखणाऱ्या पासवान यांनी स्वतःला अनेक पदे मिळवली. २०२४ साली येणाऱ्या निवडणुकीत पासवान पुन्हा काही नवीन दिशा ओळखतील का ? हे पाहावे लागेल

Team Nation Mic

Recent Posts

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…

11 months ago

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…

1 year ago

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…

1 year ago

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…

1 year ago

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…

1 year ago

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…

1 year ago

This website uses cookies.