गल्ली ते दिल्ली

शरद पवार जेव्हा पुस्तक न वाचताच पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमाला गेले; एक भन्नाट किस्सा!

हा किस्सा १९७८ सालचा. तेव्हा शरद पवारांनी पुलोदचा प्रयोग केलेला. पुलोद गटामध्ये कॉंग्रेसविरोधी असणाऱ्या चाळीस आमदारांचा गट व त्या गटाला पाठिंबा देणारे समाजवादी, भाजप, कम्युनिस्ट, शेतकरी कामगार पक्ष असे अनेकजण होते.

त्याच वेळी एका जाहिर कार्यक्रमात हा फसवाफसवीचा (मजेशाीर) उद्योग करण्यात आला.

कुसूम अभ्यंकर या त्यावेळी रत्नागिरीच्या आमदार होत्या. लोकप्रतिनिधी बरोबरच त्या उत्तम वक्त्या आणि लेखिका देखील होत्या. त्यांनी नविन कादंबरी लिहली होती व कादंबरीच प्रकाशन शरद पवारांच्या हस्ते करण्याचं नियोजित करण्यात आलं होतं.

शरद पवारांसोबतच व्यासपीठावर होते. ग.प्र प्रधान, सुशिलकुमार शिंदे, सदानंद वर्दे, गोविंदराव आदिक, विनायक पाटील अशी वक्त्यांची यादी देण्यात आली होती.

या यादीनुसार सर्वात पहिला उद्घाटक म्हणून शरद पवार बोलणार होते तर सर्वात शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग.प्र. प्रधान मास्तर बोलणार होते.

आत्ता गंमत म्हणजे, हे पुस्तक खुद्द शरद पवारांनी देखील वाचलं नव्हतं. तर पुढे असणाऱ्या वक्त्यांच्या यादीबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही. तेव्हा नुकतच सरकार स्थापन झाल्यानं सगळेच आपआपल्या कामात व्यस्त. वेळ तर कोणाला मिळणार. त्यातही हा कार्यक्रम दादरमध्ये.

आत्ता इतक्या मोठ्या श्रोत्यांपुढे न वाचलेल्या कादंबरीबद्दल काय बोलणार. एकुणच काय तर आत्ता पुढे कस होईल म्हणून प्रत्येकालाच टेन्शन आलं होतं आणि या शरद पवारांचा देखील नंबर होता.

पण या यादीत अस एक नाव होतं की जे पुस्तक न वाचता कार्यक्रमाला येणं शक्य नाही हा विश्वास होता. ते नाव म्हणजे ग.प्र.प्रधान याचं.

पण प्रधान हे कार्यक्रमाचे अध्यक्ष. अध्यक्षीय भाषण तर सर्वात शेवटी होणार होतं.

व्यासपीठावर कुजबूज चालू झालेली. आत्ता कस होणार ? इतक्यात विनायक पाटील म्हणाले, मी करतो काहीतरी..ते तडक उठून आयोजकांकडे गेले आणि त्यांना रागातच म्हणाले, अहो चाललय काय ?

आयोजकांना काय चुकलय ते नेमकं कळालं नाही त्यांनी विचारलं ? काय झालं ?

यानंतर विनायक पाटील म्हणाले, “अहो वक्त्यांची यादी बघा. प्रधान सर्वात शेवटी बोलणार आहेत. अध्यक्ष असले म्हणून काय झालं ? ते सर्वात सिनियर आहेत. त्यांनी अस सर्वात शेवटी बोलणं चुकीच दिसतं. अस म्हणत, विनायक पाटलांनी कागद घेतला आणि वक्त्यांचा क्रम बदलला.

कार्यक्रमाची सुरवात झाली आणि…

यानंतर मग कार्यक्रमाची सुरवात झाली ती ग.प्र. प्रधान यांच्या भाषणाने. ते कादंबरीवर तासभर बोलले तेही त्यांच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे उत्तम. पुढच्या वक्त्यांना कादंबरीत नेमक काय आहे ? इथपासून बोलण्यासाठी खूप काही मिळालं.

शरद पवारांपासून सुशिलकुमार यांच्या पर्यंत सर्वांनी त्यांच्या भाषणातील मुद्दे उचलले व दहा पंधरा मिनटांच भाषण ठोकून दिलं. विनायक पाटलांच्या या आयडियाबद्दल देखील धन्यवाद मानण्यात आले.

Team Nation Mic

Recent Posts

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…

10 months ago

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…

1 year ago

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…

1 year ago

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…

1 year ago

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…

1 year ago

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…

1 year ago

This website uses cookies.