Take a fresh look at your lifestyle.

बार्शीतला ‘फटे स्कॅम’ नेमका आहे तरी काय?

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीमधून मोठा नफा कमवून देण्याचं आमिष दाखवून विशालने बार्शी, सोलापूरातील अनेकांना करोडोंचा गंडा घातला आहे.

0

सध्या बार्शी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे ‘विशाल फटे’.

त्याला कारणही तसंच आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीमधून मोठा नफा कमवून देण्याचं आमिष दाखवून विशालने बार्शी, सोलापूरातील अनेकांना करोडोंचा गंडा घातला आहे.

बार्शीकरांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला विशाल फटे स्वतःहून पोलिसांसमोर शरण येणार आहे. तसे स्पष्टीकरण खुद्द विशालने केले आहे. याबाबतचा एक व्हिडिओ त्याने यूट्यूबवर अपलोड करुन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

आपण जो व्यवसाय केला त्यात कुटुंबातील कुठल्याच सदस्याचा सहभाग नव्हता. फक्त कागदोपत्री ते संचालक होते. असा खुलासा यानिमित्ताने फटे याने केला आहे.

ज्यांचा मनी मल्टिफिकेशनवर विश्वास बसत नाही त्यांनी ट्रेंडिंग व्हीवच्या पेड प्लॅनमध्ये जाऊन राहुल कृष्णाच्या फंडयाचा अभ्यास करावा. आपणही तो करत होतो. पण आपल्याला वेळ कमी मिळाला त्यामुळं सारं संपलं, असं फटे याने व्हिडिओ म्हंटले आहे.

कोण आहे विशाल फटे ?

विशाल बार्शीमध्ये नेटकॅफे चालवत होता. नेट कॅफे चालवताना तो काही प्रमाणात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक देखील करत होता. लोकांना त्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवले.विशाल हा मूळचा मंगळवेढ्याचा आहे. त्याचे वडील बार्शीतल्या एका महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यामुळे त्या सगळ्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून बार्शीतच वास्तव्य आहे.

शेअर मार्केट अल्गोरिदमच्या नावाखाली बार्शीतल्या असंख्य नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप विशाल फटेवर आहे. त्याच्याविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात आतापर्यंत 68 गुंतवणूकदारांनी फसवणुकीची फिर्याद दिली आहे. त्यात जवळपास 18 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे.

फटे हा लाखो रुपये लोकांकडून घेत होता. सुरुवातीला त्याने गुंतवणूकदारांना परतावा देखील दिला.

परंतु नंतर जेव्हा लोक पैसे काढून घ्यायला जायचे तेव्हा आता काढू नका, एक दोन महिन्यात नवीन आयपीओ येणार आहे असं सागायचा. याचप्रकरणी सगळ्यात आधी दीपक आंबरे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात विशाल फटे याने आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार नोंदवली होती.

मात्र, आता याप्रकारणी जवळजवळ 70 हून अधिक जणांनी आपली फसवणूक झाल्याचं म्हटलं आहे.

फटे याने एक व्हिडीओ प्रसारित केला असून त्याने त्यात स्पष्टीकरण दिलं आहे

अनेक लोकांनी माझ्या नावावर शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न केला. नेमकं प्रकरण मला माहित आहे. कोणाचेही पैसे बुडविण्याचा माझा कधीच विचार नव्हता आणि पुढेही नाही. “माझ्या घरच्यांचा माझ्या व्यवहाराशी कुठलाही संबंध नाही. अनेकांना मी व्यवसाय सुरू करायला मदत केली आहे. मी कोणालाही प्रलोभन दाखवलं नाही मी प्रॅक्टिकली ते करण्याचा प्रयत्न केला. मी संध्याकाळपर्यंत जवळच्या पोलीस स्टेशनला हजर होणार आहे,” फटे सांगतो.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.