२७ वर्षानंतरही गुजरातमध्ये भाजपचाच मुख्यमंत्री पुन्हा सत्तेत आला आहे. भाजपला मिळालेलं हे यश हे एका मराठी माणसाच्या नेतृत्वाखाली मिळालंय.

तो मराठी माणूस म्हणजे भाजपचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील

सूरतचे खासदार आणि गुजरात भाजपचे अध्यक्ष अशी त्यांची आताची राजकीय ओळख. पण मूळचे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील असलेले, मराठी असलेले पाटील सुरत मध्ये गेले. तेथे स्थायिक झाले.

1975 साली ते गुजरात पोलिसांत भरती झाले. त्यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांच्या अडचणींसाठी 1984 मध्ये त्यांनी पोलिसांची एक संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न केला. त्यांची ही कृती वरिष्ठांना न आवडल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

1980 साली भाजपात प्रवेश केल्यानंतर पाटील यांनी 1995 ते 1997 व 1998 ते 2000 पर्यंत जीआयडीसीचे नेतृत्व केले होते.

2009 मध्ये नवसारी मतदार संघातून लोकसभेवर पोहोचले. त्यानंतर 2014 व 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांचा विजय झाला. 2019च्या निवडणुकीत त्यांनी सुमारे 6 लाख 89 हजार 668 च्या मताधिक्याने विजय संपादन केला होता.

जुलै 2020 मध्ये त्यांची गुजरात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. पण नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या 2 वर्षांतच त्यांनी पक्षाला एका नव्या उंचीवर पोहोचवले आहे.