कॅमेरामागची दुनिया

एकेकाळी हॉटेलमध्ये काम करायची वाणी कपूर

2013 मध्ये शुद्ध देसी रोमान्स या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री वाणी कपूरला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत अभिनय कारकीर्द सुरू करणाऱ्या वाणीने कधीच मागे वळून पाहिले नाही.

चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी वाणी हॉटेलमध्ये काम करायची. दिल्ली ते बी-टाऊन असा वाणीचा प्रवास आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सध्या बेलबॉटम सिनेमामुळे चर्चेत असलेली वाणी कपूर, सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे. ती तिच्या आगामी मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये सध्या खूप व्यस्त आहे. बेलबॉटमनंतर वाणी आता शमशेरा या तिच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. ज्यात ती रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. त्यानंतर वाणी आयुष्मान खुरानासोबत त्याच्या ‘चंदीगड करे आशिकी’मध्ये दिसणार आहे.

वाणी कपूरने बॉलिवूडच्या सर्व मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. रणवीर सिंगसोबत ‘बेफिक्रे’ असो किंवा हृतिक रोशनसोबत ‘वॉर’ असो, वाणीने तिच्या अभिनयाने सर्वांना खूष केले आहे. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? की फिल्म इंडस्ट्रित येण्यापूर्वी वाणीचा बॉलिवूडशी यापूर्वी कधीही संबंध नव्हता.

जन्म आणि शिक्षण

वाणीचा जन्म 23 ऑगस्ट 1988 रोजी दिल्लीत झाला. तिचे वडील शिव कपूर यांचा दिल्लीत फर्निचरचा व्यवसाय आहे. तर आई डिम्पी कपूर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते. वाणी कपूरने तिचे संपूर्ण शिक्षण दिल्लीतूनच केले आहे.

वाणी कपूरने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून पर्यटन विषयात पदवी प्राप्त केली आहे. पर्यटनाचा अभ्यास केल्यानंतर तिने जयपूरच्या ओबेरॉय हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये इंटर्नशिप केली आणि नंतर आयटीसी हॉटेलमध्येही काम केले.

अभिनयाची संधी

जेव्हा वाणीला हॉटेलमधील काम सोडून मॉडेलिंगमध्ये आपले नशीब आजमावायचे होते, तेव्हा तिचे वडील मॉडेलिंगच्या विरोधात होते. पण तिला तिच्या आईने तिला पाठिंबा दिला. त्यानंतर तिने प्रसिद्ध फॅशन डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केला. ज्यामुळे टेलिव्हिजन जाहिरातींमध्ये तिला अभिनयाची संधी देखील मिळाली.

वाणीने तिच्या कारकीर्दीला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईला स्थलांतर केले आणि अनेक ऑडिशन्स दिल्या. त्यानंतर तिला शुद्ध देसी रोमान्स या चित्रपटातामध्ये काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारही मिळाला आहे.

Team Nation Mic

Recent Posts

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे…

10 months ago

डोनाल्ड ट्रम्प गुन्ह्यात अटक होणारे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष; काय आहे ‘पॉर्नस्टार’ प्रकरण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे.…

1 year ago

Maharashtra Budget : राज्याचा अर्थसंकल्प कसा तयार होतो? देवेंद्र फडणवीस लिहितात…

उद्या गुरुवार दि. ९ मार्चच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर…

1 year ago

हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय ? तो कसा आणला जातो ?

आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू…

1 year ago

हिंडेनबर्ग रिसर्च आहे तरी काय? ज्याने अदानीना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला

अदानी समूहाचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अक्षरशः धराशायी झाले आणि समूहाच्या गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं.…

1 year ago

वयाच्या १०व्या वर्षी पहिलं स्टार्टअप ते ट्विटरची खरेदी, इलॉन मस्क यांचा प्रवास

सध्या संपूर्ण जगात सर्वाधिक चर्चेत असलेला व्यक्ती कोण ? असा प्रश्न विचारला तर याच उत्तर…

1 year ago

This website uses cookies.