काँग्रेसचे नेमके काय चालले आहे?
काँग्रेसमध्ये सध्या जे काही सुरू आहे, ते पक्षाचा पराभव आणि नेतृत्वाची पोकळी यांतून निर्माण झालेली अनियंत्रित अंदाधुंदी आहे. ही अवस्था काँग्रेसने लवकर संपवली नाही, तर १९९० च्या दशकात झाले त्याप्रमाणे पक्षाची अनेक शकले होतील किंवा गेल्या वर्षभरात घडते आहे, त्याप्रमाणे पक्ष आतून आणखी-आणखी पोकळ बनत जाईल…
राहुल गांधी यांचा उत्तराधिकारी शोधण्याच्या कामाचं घोडं एकाच मुद्द्यावर अडलंय. काँग्रेसला अशा व्यक्तीची गरज आहे, जो अखिल भारतीय काँग्रेस समिती आणि गांधी कुटुंब यांच्यातील सेतू म्हणून काम करू शकेल. काँग्रेसमधे पिढीबदल व्हावा म्हणजेच नव्या पिढीकडे काँग्रेसची सूत्रं सोपवावीत, अशी सूचना कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी केलीली आहे . परंतु, त्यावर पक्षांतर्गत एकमत होऊ शकले नाही. याच कारणामुळे पक्ष कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्यायला कचरताना दिसतोय.
काँग्रेसला आता आधुनिक काळातील पक्ष म्हणून पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. नेहरू-गांधी कुटुंबावर नको एवढं अवलंबित्व ही पक्षासमोरची पहिली समस्या आहे. याच कारणामुळे पक्ष कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्यायला कचरताना दिसतोय.
राहुल गांधी ना पक्ष सोडण्याची भाषा करताहेत ना राजकारण. ही गोष्ट पक्षाच्या नेत्यांनी समजून घ्यायला हवी. त्यांना केवळ अटलबिहारी वाजपेयींप्रमाणे भूमिका बजावायची आहे. वाजपेयी अनेक दशकं पक्षामध्ये कोणत्याही पदावर नव्हते. मात्र पक्षाचा चेहरा आणि निवडणुकांमध्ये पक्षाचे प्रमुख प्रचारक वाजपेयीच असायचे.
निवडणुका थांबल्या
१९७२ नंतर पक्षात विविध भागातील प्रतिनिधित्वाची परंपरा लयास जाऊ लागली. पक्षातील निवडणुका थांबल्या व थेट नेमणुका होऊ लागल्या. एकेकाळी काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील सुमारे ८ हजाराहून अधिक सहकारी सोसायट्यांमध्ये १९७७ पासून एकदाही निवडणूका झालेल्या नाहीत. वास्तविक सहकारी सोसायट्या या विधानसभा मतदारसंघाशी जोडलेल्या असतात. ती रचना संपुष्टात आली.
१९७७मध्ये पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर प्रदेश, जिल्हा स्तरावर निवडणुका घेणे बंद झाले. इंदिरा गांधी यांचे चिरंजीव संजय गांधी यांच्या नेतृत्वाखाली यूथ काँग्रेस हा त्यांनाच मानणाऱ्यांचा अड्डा बनला.
१९७० ते १९८० दरम्यान इंदिरा गांधी यांच्या हाती पक्षाची सर्व सूत्रे
आल्यानंतर त्यांनी अनेक प्रभावशाली नेत्यांचे पत्ते कट केले. आपल्या मुलाला
आपला वारसदार करण्याच्या त्यांच्या प्रयत्नाने हा पक्ष त्या घराण्याच्या
ताब्यात गेला.
२०००सालानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसमध्ये पुनरुज्जीवन करण्यासाठी काही
प्रयत्न हाती घेतले. त्यांनी निवडणुका घेण्यास सुरवात केली त्याचे यश मध्य
प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमधील विजयातून दिसून येते. पण या प्रयत्नांचा
वेग अतिशय संथ आहे. अजूनही पक्ष निवडणुकांपेक्षा गटातटाच्या राजकारणावर
अवलंबून आहे.
छोटा कार्यकाळ पण महत्वाचा
पक्षाध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांचा दुसरा कार्यकाळ छोटा असू
शकतो. परंतु तो महत्त्वाचा असणार आहे. १९९८ मधे सीताराम केसरी यांना हटवून
सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या, तेव्हापासून पक्षात जबाबदारीची
भावना आणि पारदर्शकतेची संस्कृती रुजवण्यात सोनियांना अपयश आलं. पुत्रप्रेम
आणि पक्ष संघटनेशी असलेली बांधिलकी यात त्या संतुलन साधू शकल्या नाहीत.
अध्यक्ष म्हणून आपली स्वीकारार्हता कायम राखण्यासाठी त्या सर्वांना
बरोबर घेऊन चालत राहिल्या. ही कार्यपद्धती जपानी पद्धतीसारखी आहे. या
पद्धतींतर्गत कठोर निर्णय घेणं किंवा कठोर पावलं उचलण्याऐवजी एकत्र बसून
प्रदीर्घ चर्चेचा मार्ग अवलंबला जातो.
काँग्रेसचे नेमके काय
चालले आहे? काँग्रेसबद्दलची बातमी म्हणजे, पक्षनेते किंवा कार्यकर्ते किंवा
आमदार पक्षातून गेल्याची बातमी, असेच जास्त वेळा दिसते.’बंडखोरी’चे काय
होईल ते होवो, पण त्यातून पक्षाबद्दलचे प्रश्न पुन्हा एकदा पुढे आले आहेत!
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम